Asade

Swami Vivekanand Vidyalaya, Asade
13 Sept 2010
 शाळेतील कामकाजाबाबत माहीती घेतली. मुख्याध्यापक यांच्या सोबत IBT स्वयंपूर्णते बाबत चर्चा केली. त्यानुसार सर्व निदेशक यांच्या सोबत पुढील नियोजनाबाबत चर्चा झाली. मुख्याध्यापकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे, विज्ञान आश्रम च्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. शेती पशुपालन व उर्जा पर्यावरण विभागाच्या निदेशकांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. शाळेमध्ये फ़ी जमा करण्याचे काम चालु आहे. चर्चे नंतर खालील उपक्रम करण्याचे ठरविले आहे.
अभियांत्रिकी : शाळेमध्ये गावातील कामे करुन देणे उदा. टेबल, स्टुल, ग्रील, पाट आणि शेडची कामे घेणे. 
शेती पशुपालन : नर्सरीमध्ये रोपे तयार करुन विक्री करणे. उदा. वेखंड, ब्रम्हकमळ, ब्राम्ही, गुलाब, जास्वंद, चाफ़ा (पिवळा) इ. शेती पशुपालन विभागाचे निदेशक सायकल दुरुस्तीचे साहीत्य खरेदि करुन ; सायकल दुरुस्त करुन देणार आहेत.
गृह आरोग्य : खाद्य पदार्थ विक्री करणे. उदा. भेळ, खारेदाणे, फ़ुटाणे, चकली, गुलाबजाम.
उर्जा पर्यावरण : गावातील फ़िटींगची कामे करुण देणे. शाळेत झेरॉक्स मशीन खरेदी करणे . खरेदी केल्यास उर्जा पर्यावरणाचे निदेशक ते काम पाहणार आहेत.
11 Oct 2010
मुख्याध्यापक,समन्वयक व फ़ील्ड ऑफ़ीसर यांच्या सोबत मागील कामकाजावर चर्चा केली.
१) जिल्हा परिषद शाळेसाठी बेंच तयार करुन देण्याची ऑडर घेतली आहे. ३० बेंचेस तयार करुन देण्याचे ठरले आहे. एक बेंच तयार करण्यासाठी रु.७००/- खर्च आला.विक्री किंमत रु.९००/-  या CS मधून रु.२७०००/- Revenue मिळणे अपेक्षीत आहे. आत्ता ७०% काम पूर्ण झाले आहे. 
२) इ. १० वीच्या मुलांनी शाळेत ’साऊंड सिस्टीम’ ची जोडणी व फ़िटींग केली आहे. (इ.५वी ते १०वी वर्ग- एकूण ६ रुममध्ये) ही साऊंड सिस्टीम तयार करण्यासाठी रु. ८८५०/- खर्च आला आहे.ही साऊंड  सिस्टीम शाळेसाठी श्री. बोराडे सर,समन्वयक यांच्याकडून भेट देण्यात आली (This CS suggested by Mr.Jadhav in Training Program, that time he had given Bhivadi school example)
३) IBT मधून दोन टेबल तयार करुन गावात विक्री केली १५००x२=३०००/- 
४) उर्जा पर्यावरण: गावातील एका घराची लाईट फ़िटींग करुन देण्याची ऑडर मिळाली आहे.
५) शेती पशुपालन: रोपे तयार करण्याचे ठरविले त्यासाठी बी खरेदी करुन दिले आहे. रोपे- टोमॅटो, वांगी, मिरची, रोपे तयार करुन विक्री करणार आहेत. तयार रोपे- ३५ आंब्याची रोपे, २५-तुळस, ३०-वेखंड.
गृह-आरोग्य: खाद्य पदार्थ विक्री करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पॅकिंग करुन विक्री करणे. चकली व नानकटाई. इ.१० वी विद्यार्थ्यांनी वडापाव व पॅटीस तयार करुन विक्री केली.
फ़ी बाबत चर्चा झाली. आत्ता पर्यंत रु.११०००/- फ़ी जमा झाली आहे. फ़ी घेताना काही पालकांचे एका पेक्षा जास्त पाल्य IBT साठी असल्यामुळे त्यांच्याकडून रु. ३००/- प्रमाणे फ़ी न घेता त्यांना काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे.
पुढील नियोजनामध्ये:
१) शाळेचे कंपाऊंड तयार करणे
२) नळ कोंडावळे दुरुस्ती करुन देणे असे ठरले आहे.
३) नविन गॅस कनेक्शन घेणार आहे.

7 Dec. 2010
फ़्रान्सच्या १४ पाहुण्यांनी २ Dec.2010 रोजी शाळेला भेट दिली. त्यांनी IBT program पाहीला. शाळेला पाहुण्यांनी रु.५०००/- देणगी दिली. LAHI कडून यशोधरा भालेराव व अमृता प्रकाश उपस्थित होत्या.
IBT अंतर्गत झालेली कामे पुढील प्रमाणे:
जि.प. ३० benches order नुसार तयार करुन दिले. शाळेमध्ये साउंड सिस्ट्म बसवले. 2 Tables तयार करुन विकले. गावातील एका घराची लाइट फ़ीटींग करुन दिली. मिरची, वांगी, टोमॅटोची रोपे तयार केली व पौड येथे जाऊन त्याची विक्री केली, या विक्रीतून रु.३५०/- मिळविले. आता शेतामध्ये गवार, भेंडी लागवड करण्यात आली आहे. 
गृह - आरोग्य: विभागातुन खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आली त्यामध्ये ३२० वडापाव, १५० कप चहा यामधून रु. २५००/- मिळविले. 
आभियांत्रिकी:  विभागाने वर्गखोल्यांच्या नावाच्या पाट्या तयार करुन बसविल्या.
पुढील नियोजन:  
रोपांची विक्री, टोमॅटो व मिरची लागवड, पिशवीमध्ये उसाची रोपे लागवड करणे.
२ Tables, Shoe stands, Stool ची order मिळाली आहे ती पूर्ण करणे. Midday meal serve करण्यासाठी एक trolley तयार करणे. शाळेसाठी कंपाऊंड तयार करणे, नळ व सायकल दुरुस्ती करणे आणि गॅस कनेक्शन घेणे.
२ लाइट माळा तयार करणे.

12 Jan. 2011
समन्वयक  यांच्या सोबत मागील कामाबाबत आढावा घेतला पुढील कामकाजावर चर्चा केली. 
शेतीपशुपालन: मिरची, वांगी यांची रोपे तयार करण्यात आली. २ गुठें श्रे. ह्या पिकांची लागवड करण्यात आली.
नर्सरी मध्ये रोपे तयार केली. आंबा ३५, कडीपत्ता १५, जांभूळ २५, वेखंड ३५, चिंच १०, तुळस २५, कोरफ़ड २५.
आभियांत्रिकी: वस्तीगृहाची नळ दुरुस्ती केली. चप्पल Stand तयार करुन दिले Revenue ३९०/-. गावातील दोन बैलगाडया वेल्डींग करुन दिल्या Revenue २००/-. गावातील मंदीरासाठी लोखंडी बोर्ड तयार करुन दिले Revenue ८५०/-.शाळेतील विद्यार्थ्यांनीच्या सायकल दुरुस्त करुन दिल्या Revenue १२५/-. 
गृह - आरोग्य: या विभागात शाळेत चहा करुन देण्यात आला Revenue ६०/-. 
पुढील नियोजन: 
१) उस लागवडीसाठी १००० रोपे तयार करणे.
२) शाळेसाठी टेबल तयार करणे.
३) सायकल दुरुस्तीचे साहीत्य खरेदी करणे.
४) शाळेतील नळ दुरुस्त करणे.
५) मकरसंक्रांती निमीत्त्ताने वाण तयार करुन विक्री करणे.
फ़ी जमा-१५५००/-